विद्युत खांबाच्या सपोर्टिंग ताराला स्पर्श ; शेतकरी महिलेचा शेतातच मृत्यू

विद्युत खांबाच्या सपोर्टिंग ताराला स्पर्श 

शेतकरी महिलेचा शेतातच मृत्यू

कुही :-  तालुक्यातील खरबी शेतशिवारात शेतातील तन विळ्याच्या सहाय्याने काढत असताना विद्युत खांबाच्या सपोर्टिंग ताराला स्पर्श झाला. ताराला करंट असल्याने  करंट लागून महिलेचा मृत्यू झाला आहे.

                                                पुष्पा सखाराम वैद्य (वय-50) रा. खरबी,ता.कुही असे मृत महिलेचे नाव आहे. मृतक महिलेचा मुलगा फिर्यादी पंकज वैद्य याने दिलेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे मृतक पुष्पा या सकाळी ७ च्या सुमारास गेल्या होत्या. पावसापासून बचावासाठी शेतात झोपडी तयार करण्यासाठी शेताच्या धुऱ्यालगत असलेले तन व गवत काढत होते. अचानक त्यांचा स्पर्श  असलेल्या विद्युत पोलच्या सपोर्टिंग ताराला झाला. मात्र ताराला करंट असल्याने त्या तेथेच चिटकून पडल्या. 9 वाजताच्या मुलगा पंकज शेतात गेला मात्र त्याला आई दिसून आली नाही. इकडे तिकडे शोधाशोध घेतल्यावर त्याला त्याची आई मृतक पुष्पा वैद्य ह्या सपोर्टिंग ताराजवळ पडून दिसल्या. त्याने जवळच्या दुपट्याने आईला तारापासून दूर केले. व लागलीच आईला बैलबंडीत टाकून शेतातून घरी घेऊन आला व तेथून गाडीने कुही येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल केले.  मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून पुष्पा यांना मृत घोषित केले.  या प्रकरणाची कुही पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. सुधीर ज्ञानबोनवार करीत आहेत.

(टीप:- जर आपण पत्रकार आहात आणि आपण येथील बातम्या कॉपी करत असाल तर तुम्हाला बातम्या लिहिण्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे. )