तालुक्यात पावसाचा कहर ; अनेक गावांना पाण्याचा वेढा तर काही गावांचा संपर्क तुटला ; जाणून घ्या कुठे काय परिस्थिती

कुही तालुका जलमय ; कोसळदार पावसाने आमनदी फुगली ; संपर्क तुटले, गावांना पाण्याचा वेढा, रस्ते अडले!

स्वप्नील खानोरकर ( विशेष प्रतिनिधी)

कुही:- तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत केले आहे. सोमवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आमनदीने रौद्र रूप धारण करताच अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यातील काही मार्ग पूर्णतः बंद आहेत, तर अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे.

पावसाचा कहर – संपर्क यंत्रणा पूर्णतः खंडित

तालुक्यातील आधीच डबघाईस गेलेल्या रस्त्यांवर असंख्य खड्डे आहेत. आता या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे मार्ग ओळखणे अशक्य झाले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.अनेक शाळांच्या मैदानात पाणी साचले असून, घरांच्या परिसरातही पाणी शिरल्याने नागरिक भयभीत आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.सकाळपासून बहुतांश नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांनी अशा ठिकाणी प्रवास टाळावा, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेषतः नदी नाल्यावरील पुलांवरून ये-जा थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


तालुक्यातून बाहेर पडणारे सर्वच रस्ते बंद

  1. कुही ते नागपूर (पाचगाव मार्ग) माळनीच्या पुलावर पाणी असल्याने बंद
  2. कुही ते वडोदा सावळी नजीक पुलावर पाणी असल्याने बंद
  3. कुही ते उमरेड मार्ग आमनदीला पूर अस्लाय्ने बंद
  4. कुही ते मौदा (चापेगडी) नागनदीला पूर असल्याने बंद

तालुक्यातील पुढील गावांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे.

शिवणी – सर्व मार्गांवर पाणी; शिवणी ते कुजबा, शिवणी ते कीन्ही रस्ते बंद

भोरदेव – बाहेर जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली

कीन्ही – गावाच्या चारही बाजूला नाले ओसंडले; पाण्याचा वेढा

चिखलाबोडी – लोहारा रस्ता बंद

पचखेडी – तारणा रस्त्यावर पूर


मांढळ, टाकळी, कुजबा, शिकारपूर, बोथली, वग, वेलतुर, टेकेपार, गोन्हा, डोंगरमौदा, वेळगाव – अनेक गावांशी संपर्क खंडित आहे.


बंद पडलेले प्रमुख रस्ते – वाहतूक ठप्प

१. शिवणी – कुजबा रस्ता
२. हरदोली – वग रस्ता
३. बोरी सदाचार – मांडळ रस्ता
४. शिकारपूर – बोथली रस्ता
५. कुजबा – टाकळी रस्ता
६. चन्ना – टाकळी रस्ता
७. मांढळ – उमरेड (विरखंडी पुलावर पाणी)
८. डोंगरमौदा – वेळगाव रस्ता
९. वेलतुर – टेकेपार
१०. वेलतुर – गोन्हा
११. पचखेडी – मांडळ रस्ता

नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच प्रवास करावा. पूरग्रस्त भागात जाण्याचे टाळावे.पुलावरून पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणी प्रवेश करू नये. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

#आपल्या परिसरातील पावसाच्या प्रत्येक अपडेटसाठी वाचत राहा.
NGPNEWSLIVE