मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुहीत भव्य रक्तदान शिबीर; शेकडो रक्तदात्यांचा सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुहीत भव्य रक्तदान शिबीर ; शेकडो रक्तदात्यांचा सहभाग

स्वप्नील खानोरकर 

कुही :–विकासाचे महामेरू, प्रखर राजनीतितज्ञ, वरिष्ठ नेता,महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय,निर्णायक नेतृत्व मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कुही मंडळ तर्फे आज कौशल्या मंगल कार्यालय, कुही येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे आयोजन भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरेड विधानसभेचे माजी आमदार सुधीर पारवे होते, तर उद्घाटक म्हणून आस्तिक सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.या वेळी भाजपा कुही मंडळाचे अध्यक्ष निखिल येळणे,वामन श्रीरामे, इस्तारी तळेकर,परमानंद दंडारे, भाजपा युवा मोर्चा तालुका प्रमुख सौरभ दंडारे,नामदेव साखरकर  युवा नेते निलेश दंडारे,मयूर हिरेखन, रवी तुळसकर, दीपंकर हिरेखन आदींसह आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मंडळातील सर्व पदाधिकारी, विविध आघाडीचे प्रमुख, महामंत्री, बूथ प्रमुख तसेच सुपर वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, एका युनिट रक्ताने तीन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यातही आपत्तीच्या काळात, अपघात, प्रसूती किंवा गंभीर आजारांमध्ये रक्ताचा तुटवडा भासतो. अशा वेळी रक्तदात्यांनी दिलेले रक्त म्हणजे जीवनदायी अमृत ठरते.कार्यक्रमाची सांगता रक्तदान हेच खरे जीवनदान हा संदेश देत करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुढील काळात नियमित रक्तदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.या सामाजिक उपक्रमातून मा. देवेंद्र फडणवीस कार्यप्रवणतेला आणि भाजपाच्या सेवा संस्कृतीला प्रत्यक्ष कृतीतून सलाम करण्यात आला.कुहीकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिर यशस्वी झाले.