हॉटेल रेस्पीरो येथे अवैधरित्या दारू विक्री आणि हुक्का पार्लवर धाड ; उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरेड यांची कामगिरी

हॉटेल रेस्पीरो येथे अवैधरित्या दारू विक्री आणि हुक्का पिण्यास उपलब्ध करून देणाऱ्या ४ आरोपीतांवर गुन्हा नोंद

उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरेड यांची कामगिरी

कुही :- सोमवारी  वृष्टि जैन, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरेड यांना गुप्त बातमीदाराने माहीती दिली की, पोलीस स्टेशन कुही अंतर्गत कुही फाटा येथील रेस्पीरो हॉटेल येथे हॉटेल मालक आणि मॅनेजर हे स्वतःच्या अर्थिक फायदयासाठी अवैधरित्या दारू तसेच हुक्का बाळगुन ग्राहकांना पिण्यास उपलब्ध करून देत आहे. अशी माहिती मिळाली

 

लागलीच  वृष्टि जैन यांनी तात्काळ उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय उमरेड चे अंमलदार आणि कुही पोलीस स्टेशन चे अधिकारी तसेच अंमलदार यांचे पथक नेमुन पथकासह कुही फाटा येथील रेस्पीरो हॉटेल येथे पंचासमक्ष छापा टाकला असता तिथे आरोपी क्रं १ ) नामे सतीश तापेश्वर शर्मा, वय ३५ वर्ष, रा. प्लाट नं. ३५, तृप्तीनगर, बेलतरोडी नागपुर, (हॉटेल मॅनेजर) आणि २)सुनिल इंद्रबहादुर सिंग ठाकुर, वय ४७ वर्ष, रा. प्लाट, नं. ५६ मानेवाडा रिंगरोड, नागपुर ( किचन मॅनेजर) हे मिळुन आले. पंचासमक्ष हॉटेलची झडती घेतली असता हॉटेल मध्ये टेबलवर अर्धवट भरलेली ब्लेंड २८५ सिग्नेचर १ लीटर ची बॉटल टेबलवर १४ हुक्का पॉट ज्यामध्ये जीवंत अंगारे असलेले, हॉटेलचे किचन मध्ये एक दारूची पेटी ज्यामध्ये बॅलेनटाईन, ऑगर मास्टर लेबल अशी विदेशी दारू मिळुन आली. आरोपीला परवान्या बाबत विचारना केली असता त्यांचे कडे कोणताही परवाना नव्हता. आरोपी मॅनेजर ला सदर रेस्पीरो हॉटेल मालकाचे नाव पत्ता विचारले असता सदर हॉटेलचे मालक नामे ३) अमीतकुमार ओमप्रकाश रॉय, वय ४६ वर्ष, रा. नंदनवन, नागपुर आणि ४) राहुल कटकवार, रा. पारडी, नागपुर असुन यांच्या सांगण्याप्रमाणेच विनापरवाना दारू विकी आणि अवैधरित्या हुक्का बाळगुन ग्राहकांना पिण्यास उपलब्ध करून देत

असल्याबाबत माहीती समजली. पोलीसांनी पंचासमक्ष ब्लेंड २८५ सिग्नेचर १ लीटर ची बॉटल १४ हुक्का पॉट प्रत्येकी १५०० /- रू प्रमाणे एकुण २१००० /- रूपये, बॅलेनटाईन, ऑगर मास्टर लेबल विदेशी दारू आणि जुन्या वापरत्या खुर्च्या असा एकुण १,०२,६५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी यांचे विरूध्द पोलीस स्टेशन कुही येथे कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, सह कलम ४ (क), २१ (क) सिगारेट आणि ईतर तंबाखू उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन यांचे विनियमन) अधिनियम २००३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.