अजब ! कुहीचा स्वप्नील यवतमाळ नगरपरिषदेच्या फेसबुक पेज वर..?
कुही – शहरातील स्वप्नील बगवे या युवकाची यवतमाळच्या एका फेसबुक पेज वरील फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
फेसबुकवर यवतमाळ नगरपरिषद म्हणून पेज आहे. या पेज वर यवतमाळ नगरपरिषद येथील कार्यक्रम, उपक्रम सह इतर माहिती पोस्ट केली जाते. मात्र यावरील एक पोस्ट कुही तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पेज वरील माहीतनुसार २१ ऑगस्ट रोजी यवतमाळ नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती टिम उपक्रम माझी वसुंधरा अभियान 6.0 (ULB CODE 802727 ) अंतर्गत यवतमाळ नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती टिम आयोजित “पर्यावरणपुरक पारंपरिक बैल सजावट छायाचित्र स्पर्धा २०२५” अंतर्गत स्पर्धकांचा छान प्रतिसाद अश्या आशयाच्या पोस्ट अपलोड करण्यात आली. व त्या पोस्ट मध्ये काही स्पर्धकांच्या बैलजोडी सोबत फोटो टाकण्यात आल्या. पण त्यात पहिल्याच क्रमांकाची फोटो हे कुही तालुक्यातील चाय सेंटर चालवणाऱ्या स्वप्नील बगवे याची होती. फोटोत तो हातात बैलजोडी घेऊन होता. व बाजूला त्याची आई उभी होती. पण तो कधीहि बैलजोडी घेवून यवतमाळला गेला नाही.

त्याची फोटो थेट यवतमाळच्या फेसबुक पेज वर पाहून काहींनी त्याला विचारणा केली असता फोटो पाहून तोही अवाक झाला. फोटो बाबत स्वप्नीलला विचारणा केली असता सदर फोटो हा मागच्या वर्षीची असून त्याने तो फेसबुक वर टाकला होता. व त्याने यंदा तो कुठेच पोस्ट अथवा शेयर केला नाही. त्यामुळे कोणत्या आधारावर तो फोटो यवतमाळ नगरपरिषद यांच्या फेसबुक पेज वर अपलोड केला आहे असा सवाल खुद्द स्वप्नील याला पडला आहे.


