पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात शिरून चेन स्नॅचिंग ; घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद

पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात शिरून चेन स्नॅचिंग  

घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद

नागपूर : शहरात भरदिवसा आता लुटमार चेन स्नैचिंग आणि मोबाइल हिसकावण्याच्या घटना वाढत आहे. यातच अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा चक्क पार्सल देण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजनी परिसरात राहणारी महिला घरी एकटी असताना अज्ञात आरोपी डिलीव्हरी बॉयच्या वेशात पोहचला. चोरट्याने हेल्मेट घालून पार्सल देण्यासाठी आल्याची बतावणी केली. महिलेला वाटले कि, त्यांच्या मुलीने जेवणाचे पार्सल पाठविले असावे. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला. आरोपीने दिलेल्या कागदावर सही करू लागल्या. अचानक आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. या झटापटीत चोरट्याच्या हातात गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लागले. ते घेऊन त्याने पळ काढला. हे सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झालय. महिलेने आरडाओरड केली असता लोक येईपर्यंत चोरटा फरार झाला. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीचा आधारे अजनी पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.