नागपूर – नागभीड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ४९१ कोटींची तरतूद
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या नागपूर-नागभीड या ब्रॉडगेज रेल्वेमागांचे काम उमरेडपर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्याच्या ४९१ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
नागपूरला उमरेडसह भिवापूर, भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काम्पा, नागभीडशी जोडणारा अतिशय महत्त्वाचा हा रेल्वेमार्ग आहे. नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होणारा महाराष्ट्रातील हा शेवटचा रेल्वेमार्ग आहे. या रेल्वे मार्गामुळे नागपूरला उमरेड, भिवापूर, भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काम्पा, नागभीडशी जोडणारा अतिशय महत्त्वाचा हा रेल्वेमार्ग आहे. नागपूर ते गोंदिया आणि नागपूर ते बल्लारशहा आणि नागपूर ते वर्धा अतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सुधारित खर्चास आणि त्यासाठी राज्य शासनाचा वाटा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. या निर्णयानुसार राज्य शासन रेल्वेला ४९१ कोटी ५ लाख रुपये देणार आहे. भारतीय रेल्वे आणि राज्य सरकारच्या ५० टक्के वाट्या मधून या प्रकल्पाचे काम सुरू आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ५० टक्के आर्थिक भार उचलण्याचे धोरण आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास नागभीड ते वडसा देसाईगंज, गोंदिया तसेच पुढे गडचिरोलीपर्यंत विस्तारला जाणार आहे. यामुळे या भागातील जनतेला दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ल्यातील रेल्वेचे जाळे सक्षम होण्यास मदत होणार आहे.


