कुही शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला ; अनेकांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला

कुही शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला

अनेकांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला

कुही :- गेल्या वर्षभरापासून कुही शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांतून अनेक पाळीव प्राणी जखमी झाले असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.मात्र याबाबत कुही नगरपंचायत कुठलेही कारवाई करत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे.

 

कुही शहरातील विविध भागांत रात्री तसेच पहाटेच्या सुमारास कुत्र्यांचे कळप रस्त्यावर फिरताना दिसतात. या मोकाट कुत्र्यांनी घरासमोर बांधलेल्या शेळ्या, वासरे व इतर पाळीव जनावरांवर हल्ला केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तर काही घरांतील पाळीव कुत्रे  या हल्ल्यांत सापडून जखमी झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.  लहान मुले व वृद्ध नागरिक बाहेर फिरताना धोक्याची शक्यता असल्यामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “रात्री उशिरा बाहेर पडणे कठीण झाले आहे. शहरातील बहुतांशी चौकात, व गल्लीत या मोकाट कुत्र्यांचे झुंड दिसून येत आहे. जिल्ह्यात मौदा व कन्हान, कांद्री या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबास्तांसाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्या धर्तीवर कुही नगरपंचायतीने तात्काळ मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणावी, तसेच प्राणी पकडण्याचे अभियान राबवावे अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून अद्याप मोठा पाऊस उचलण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

  • मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील प्रभाग क्र.१५ मध्ये मध्यरात्री १५ ते २० मोकाट मोकाट कुत्र्यांचा समूहाने एका बांधलेल्या शेळीवर हल्ला चढवला मात्र यात शेळीमालकाच्या सतर्कतेने तिचे प्राण वाचले  मात्र या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे.  तर तेथीलच पाळीव कुत्र्यालाही गंभीर जखमी केली आहे.

पुढील कारवाई

पशुसंवर्धन विभाग व नगरपंचायत एकत्रितरीत्या लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणावे, तसेच लसीकरण व निर्बिच्छीकरण (स्टेरिलायझेशन) मोहिमा वाढवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.