चांपा बस स्टॉपजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू ; दोघे गंभीर जखमी

चांपा बस स्टॉपजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू ; दोघे गंभीर जखमी

कुही :-  तालुक्यातील मौजा चांपा येथील बस स्टॉपजवळ आज शनिवार दि. 3 जानेवारीला   दुपारी १ वाजता भीषण रस्ता अपघात घडला. भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूरहून उमरेडकडे जात असताना मोटार सायकल क्र. एम.एच. 40 सी.एफ. 7190 चा चालक विक्की प्रभाकर लाखे (वय 24, रा. जवळी, ता. भिवापूर) याने दुचाकी वेगात व निष्काळजीपणे चालवून मौजा चांपा बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या ट्रक क्र. एम.एच. 40 सी.एच. 0937 ला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी देवल दशरथराव सिरसागर (वय 22, रा. सालईभट्टी, ता. उमरेड) व कुणाल वसंतराव वाढई (वय 23, रा. नांद, ता. भिवापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ट्रामा सेंटर, मेडिकल कॉलेज, नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दुचाकी चालक विक्की लाखे हा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मरण पावला. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असून, घटनेचा पुढील तपास कुही पोलीस करीत आहे.