एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणीसाठी ई – मोजणी वर्जन 2.0 लागू
कुही : एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे विभाजन तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये विभाजन / पोटहिस्सा याकरीता मोजणी फी रुपये 200/- प्रति पोटहिस्सा अशी निश्चित करण्यात आली आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागामार्फत एकत्रित कुटुंब पोटहिस्सा मोजणी प्रकार (रु. 200/- प्रति पोटहिस्सा) ई-मोजणी वर्जन 2.0 अंतर्गत अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. यामुळे जमिनीच्या विभाजन प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता व वेग येणार असून नागरिकांना वेळ व खर्चाची बचत होणार आहे.

तरी एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे पोटहिस्सा विभाजन करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनी या ई-मोजणी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप अधीक्षक, भूमी अभिलेख, कुही यांच्याकडून करण्यात आले आहे.







