Home क्राईम ओयो लॉज आणि स्पाच्या आड देहव्यवसाय : चार मुलींची सुटका ; तिघी...

ओयो लॉज आणि स्पाच्या आड देहव्यवसाय : चार मुलींची सुटका ; तिघी परराज्यातील  

ओयो लॉज आणि स्पाच्या आड देहव्यवसाय : चार मुलींची सुटका ; तिघी परराज्यातील  

नागपूर : ऑपरेशन शक्ती अंतर्गत एमआयडीसी हद्दीतील  वानाडोंगरीत ओयो लॉज आणि अजनी पोलीस हद्दीतील जोगी नगरात रहिवासी इमारतीत सुरू असलेल्या देह व्यवसाय अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या ठिकाणाहून चार मुलींची देहव्यवसायाच्या दलदलीतून सुटका केली. यातील दोन मुली पंजाबमधील लुधियाना, एक उत्तर प्रदेशातून तर चौथी शहरातल्या वेगळ्या भागातून बोलावण्यात आली होती.

सामाजिक सुरक्षा पथकाने वानाडोंगरी परिसरातील दंत चिकित्सा महाविद्यालयाला लागून असलेल्या एम. एच. ४० या ओयो लॉजवर मंगळवारी रात्री छापा घातला. येथून  निखिल नीलकंठ सोनवणे (२७) रा. चांदुर रेल्वे, अमरावती याला पथकाने अटक केली. निलकंठ हा  आपला साथीदार योगेश कैलास ठाकरे, हर्षल कैलास ठाकरे, संतोष गणपत बीसेन यांच्या मदतीने ओयो हॉटेलवरून हा देहव्यवसाय अड्डा चालवत होता. पंजाबमधील लुधियाना आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून तो तरुण महिलांना कमी वेळेत पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवत नागपुरात बोलावत होता.

छापा टाकत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने त्याच्या तावडीतून लुधियानातील २ आणि उत्तर प्रदेशातील एका महिलेची सुटका केली. कारवाईची कुणकूण लागताच योगेश, हर्षल आणि संतोष तिघे पसार झाले. दुसऱ्या एका कारवाईत पथकाने अजनी पोलीस हद्दीतील जोगी नगरातल्या गल्ली क्रमांक १० मधील एका रहिवासी इमारतीत स्पाच्या आडून सुरू असलेला देह व्यवसाय अड्डा उधळून लावला.  सामाजिक सुरक्षा पथकाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत हे छापे टाकले.

 

Don`t copy text!