Home कुही धक्कादायक ! प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालक भररस्त्यात मद्यधुंद अवस्थेत ;...

धक्कादायक ! प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालक भररस्त्यात मद्यधुंद अवस्थेत ; कुही पोलिसांत गुन्हा दाखल

धक्कादायक ! प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालक भररस्त्यात मद्यधुंद अवस्थेत ; कुही पोलिसांत गुन्हा दाखल

कुही : एसटी महामंडळाच्या चालकाने कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून बस रस्त्याच्या कडेला उभी करून झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमरेड-मांढळ मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून, याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्थानीय ​नागरिक व कुही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:१५ वाजताच्या सुमारास उमरेड आगारातून एमएच ०६ एस ८८७२ क्रमांकाची बस मांढळसाठी रवाना झाली होती. या बसचे चालक संजय सातपैसे (रा. पाचखेडी, ता. कुही) आणि वाहक नागोराव पंधरे होते.​दुपारी ४ वाजेच्या सुमारास उमरेड आगार व्यवस्थापक कोकिळा कटरे यांना माहिती मिळाली की, चालक सातपैसे याने मद्यधुंद अवस्थेत असताना बस वग ते मांढळ दरम्यान रस्त्याच्या कडेला उभी केली असून तो गाडीतच झोपला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ​घटनेची माहिती मिळताच सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रतन भाऊराव रामटेके यांनी वाहतूक नियंत्रक गणेश बांते यांच्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी चालक संजय सातपैसे हा बसमध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळला. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता, तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता आणि त्याच्या तोंडातून दारूचा तीव्र वास येत होता. ​

चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकला असता, ही बाब लक्षात घेऊन आगार प्रशासनाने तातडीने त्याला कुही पोलीस स्टेशनला नेले. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध रीतसर लेखी तक्रार (तोंडी रिपोर्ट) देण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यावर अपराध क्र.-१३८/२६ कलम-१८५ मोटार वाहन कायदयानुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित चालकावर कडक विभागीय कारवाई करावी अशी प्रवाशांनी मागणी केली आहे. ​

Don`t copy text!