Home क्राईम मूल होत नव्हते म्हणून दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात...

मूल होत नव्हते म्हणून दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात   

मूल होत नव्हते म्हणून दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात   

नागपूर : कामाच्या शोधात मध्यप्रदेशातल्या दिंडोरी येथून आलेल्या एका मजुराने सोबत काम करत असलेल्या एका दुसऱ्या मजुराच्या चिमुकलीचे अपहरण केले. कळमेश्वर येथील एस. बी. एल. स्फोटके कंपनीच्या परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केल्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुकेशकुमार धुर्वे या मजुराला अटक केली.

मुळचा मध्यप्रदेशातील दिंडोरी येथील रहिवासी मुकेशकुमार हा गेल्या काही महिन्यांपासून कळमेश्वरमधील एसबीएल कंपनीत कामाला आला होता. स्फोटके बनवणाऱ्या या कंपनी परराज्यातील अनेक मजूर अवती भोवती राहतात. कळमेश्वर पासून अवघ्या काही अंतरावरील डोरली येथे मुकेशकुमारही राहत होता. त्याच्या सोबत अमितकुमार पटेल हा देखील कुटुंबासह जवळच राहतो. अजितकुमारची अवघ्या दोन वर्षांची चिमुकली मुलगी रेशमा (नाव बदललेले) ही मुकेशकुमारला काका म्हणत होती. त्यामुळे मुकेशकुमारचा चिमुकलीवर जीव जडला. लग्नाला दहा वर्षे झाली तरी आपल्याला मूल नसल्याने तो रेशमामध्ये स्वतःच्या मुलीला पाहू लागला. तिचे लाडही करू लागला. आपल्याला मूल नाही ही भावना त्यालाही पोखरत होती. त्यामुळे न कळत्या वयात मुलीला पळवून नेले तर ती आपल्यालाही बाबा म्हणेल या भावनेने मुलीला पळवून नेत गाव गाठण्याचा डाव मुकेश कुमारच्या डोक्यात शिजत होता. शुक्रवारी रात्री मुलगी एकटी खेळत असल्याचे पाहून मुकेशकुमारने तिला अंधारातून उचलले. ओळखत असल्याने मुलीने देखील कसलीही रडारड केली नाही. ती सहज त्यांच्यासोबत निघाली. ती झोपल्याचे पाहून मुकेशकुमारने तिला रोज ने आण करणाऱ्या कंपनीच्या बसमध्ये झोपवले. इकडे घरात मुलगी दिसत नसल्याने पटेल यांनी शोधाशोध सुरू केली. मुलगी कुठेच दिसत नसल्याचे पाहून पटेल यांनी थेट कळमेश्वर पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी वेगाने शोधाशोध सुरु केली.

ज्या बसमध्ये मुकेशकुमारने मुलीला झोपवले होते, ती बसही कंपनीचीच आहे. ती परिसरातील मजुरांना रोज आणण्या नेण्याचे काम करते. मजुरांना सोडून रात्री काही कामानिमित्त बाहेर गेलेला चालक बसमध्ये आला असता त्याला बसमध्ये मुलगी झोपल्याचे दिसले. जवळच मुकेशकुमारही दिसला. दरम्यान बस चालकाला एक चिमुकली मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळल्याने त्याने तडक पोलिसांना संपर्क साधला. अखेर मुलगी सुखरूप मिळाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निःश्वास टाकला. पोलिसांनी मुकेशकुमारला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मुकेशकुमारने मुलीला पळवून गावाकडे नेण्याचा बेत असल्याचे कबूल केले

Don`t copy text!