Home कुही कुही तालुक्यात बारावी परीक्षेचा श्रीगणेशा : सात परीक्षा केंद्रांवर १८१४ विद्यार्थ्यांची नोंदणी

कुही तालुक्यात बारावी परीक्षेचा श्रीगणेशा : सात परीक्षा केंद्रांवर १८१४ विद्यार्थ्यांची नोंदणी

कुही तालुक्यात बारावी परीक्षेचा श्रीगणेशा : सात परीक्षा केंद्रांवर १८१४ विद्यार्थ्यांची नोंदणी

कुही : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी कुही तालुक्यात शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि थोडी धाकधूक दिसत होती, मात्र प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे सर्वत्र सुरळीत कामकाज पार पडले.

​कुही तालुक्यात एकूण सात परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, यावर्षी १,८१४ परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. परीक्षेसाठी खालील महाविद्यालये केंद्र म्हणून नियुक्त केली आहेत. ऋख्खडाश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुही, ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुही, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, मांढळ, आदर्श संस्कार अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मांढळ, मुकुंदराजस्वामी कनिष्ठ महाविद्यालय पचखेडी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय वेलतुर, दामोधरराव खापर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवा या केंद्रावर परीक्षा सुरळीत व शांततेत ​सुरू झाली आहे. ​शिक्षण विभागाने यंदा परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर केंद्र प्रमुख आणि सहाय्यक परीरक्षकांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहे.

शिक्षण मंडळाची विशेष भरारी पथके अचानक भेटी देऊन तपासणी करत आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ​परीक्षेचे संपूर्ण कामकाज नियंत्रित करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी तथा परीरक्षक अशोक बांते यांच्या नेतृत्वात मोठी चमू कार्यरत आहे. यामध्ये हेमंत भांडारकर, सचिन तिजारे, मनोहर वंजारी, अनिल हुमने यांसह अनेक शिक्षक व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया : ​”विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी यासाठी सर्व केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशीचा पेपर अतिशय शांततेत पार पडला, ही आनंदाची बाब आहे.”— तालुका शिक्षण विभाग, कुही

Don`t copy text!