Home कुही श्री क्षेत्र महानागबळेश्वर (दातपाडी) देवस्थान येथे महाशिवरात्री यात्रेचा उत्साह ; लाखावर भाविक...

श्री क्षेत्र महानागबळेश्वर (दातपाडी) देवस्थान येथे महाशिवरात्री यात्रेचा उत्साह ; लाखावर भाविक येण्याचा अंदाज

श्री क्षेत्र महानागबळेश्वर (दातपाडी) देवस्थान येथे महाशिवरात्री यात्रेचा उत्साह ; लाखावर भाविक येण्याचा अंदाज

कुही : तालुक्यातील सावळी -अंबाडी नजीक असलेल्या श्री क्षेत्र महानागबळेश्वर शिवशक्ति देवस्थान (दातपाडी) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.१५ आणि दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या जत्रोत्सवासाठी देवस्थान समिती व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदा एक लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ​

​कुही शहरापासून १.५ किमी अंतरावर नागनदीच्या पात्रात हे प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे. १९७४ मध्ये ह.भ.प. मूर्तिकार महाराज बुरांडे आणि लटारूजी महाराज बावनकुळे यांनी या क्षेत्राचा जीर्णोद्धार केला. ऋख्खड महाराज, गुरुलिंग बाबा अशा अनेक तपस्वींच्या साधनेने पावन झालेल्या या क्षेत्री भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. ​रविवार, दि.१५ फेब्रुवारी ला पहाटे गणेश पूजन, रुद्राभिषेक आणि घटस्थापनेने उत्सवाची सुरुवात होईल. दिवसभर भजनांचे कार्यक्रम, ह.भ.प. दामोदर लांजेवार महाराज यांचे प्रवचन होईल. रात्री १०:३० पासून विशेष शिवाभिषेक आणि शिवतांडव स्तोत्र पठण केले जाईल. ​सोमवार, दि.१६ फेब्रुवारीला सकाळी पूजा-आरतीनंतर दुपारी ३ वाजता गोपालकाला व दहीहंडीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ३:३० वाजता भव्य ‘महाशिवभंडाऱ्याला’ सुरुवात होईल.

​पंडित जितेंद्र जाऊळकर महाराज यांच्या मार्गदर्शनात सर्व विधी पार पडतील. संपूर्ण नियोजन समिती यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. ​देवस्थानच्या वतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या “भव्य शिवालयासाठी” भाविकांनी सढळ हाताने दान करावे आणि शिस्तबद्धरीत्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

Don`t copy text!