Home अपघात दहावीचा पेपर देऊन घरी परतताना काळाचा घाला ; अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू ,...

दहावीचा पेपर देऊन घरी परतताना काळाचा घाला ; अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू , आई जखमी

दहावीचा पेपर देऊन घरी परतताना काळाचा घाला ; अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू , आई जखमी

नागपूर : दहावीचा पेपर देऊन परतणाऱ्या माय लेकावर काळाने झडप घातली. भरधाव ट्रकने मोपेडला धडक दिल्याने मुलगा ठार तर आई जखमी झाली. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी परिसरात पार्किंग प्लाझासमोर घडली. अथर्व चंद्रशेखर मेश्राम (वय १६) असे मृताचे तर रीना चंद्रशेखर मेश्राम (वय ४०, दोन्ही रा. चंद्रमणीनगर, रामेश्वरी रोड) असे जखमीचे नाव आहे. अथर्व दहावीत होता.

प्राप्त माहितीनुसार, अथर्वला कामठी मार्गावरील दिल्ही पब्लिक स्कूल हे परीक्षा केंद्र मिळाले. मंगळवारी त्याने पेपर दिला. दुपारी २ वाजताच्या सुमारास रीना या त्याला घेऊन एमएच-४९-एएम-८९८४ या क्रमांकाच्या मोपेडने घरी जात होत्या. पिवळी नदी परिसरातील पार्किंग प्लाझासमोर मागाहून भरधाव आलेल्या ट्रकने मोपेडला धडक दिली. खाली पडून दोघेही जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अथर्वला मृत घोषित केले. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे

अपघातात रीना या किरकोळ जखमी झाल्या. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. अथर्वच्या मृत्यूचा जबर धक्का त्यांना बसला. अथर्वचे वडील चंद्रशेखर हे पॉवरग्रीडच्या कॅन्टीनमध्ये काम करतात. त्याचा मोठा भाऊ शिक्षण घेत आहेत. अथर्वच्या मृत्यूने मेश्राम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

Don`t copy text!