भोजापूर येथील अपघातात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

भोजापूर येथील अपघातात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुही :- नागपूर ते कुही मार्गावर भोजापूर येथील एस्सार पेट्रोलपंप नजीक वाहनचालकाचा कारवरील नियंत्रन सुटल्याने कार रस्त्यानजीक किलोमीटर दर्शवणार्या सिमेंटच्या चबुतर्‍याला आडदल्याने कारचा अपघात होऊन कारचालक युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
श्रीकांत रंगदेव वैद्य (वय २५) रा. राजोला असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी ५.३० च्या दरम्यान चारचाकी क्र. एम.एच.३२ सी ३८४९ या वाहनाने एका मित्रासह नागपूर वरून कुही मार्गे राजोला येथे परत येत असताना भोजापूर नजीक इस्सार पेट्रोलपंप जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यानजीक किलोमीटर दर्शवणार्या सिमेंटच्या चबुतर्‍याला आदडली. कार आदडल्याने कारचे समोरील चाक बाहेर निघाले व कार चालक श्रीकांत कारमधून बाहेर फेकला जाऊन रस्त्यानजीक पाटात(नाल्यात) जाऊन पडला. या अपघातात पाटातील सिमेंटच्या फरसावर पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ तत्काळ कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करत तेथून नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजोला गावात शोककळा पसरली आहे.

सिमेंटचा फरस ठरला कर्दनकाळ !
कारचा अपघात झाल्यानंतर कारचालक श्रीकांत हा रस्त्यानजीक पाटात (नाला) फेकला गेला. भोजापूर गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत याच पाटात रोडपासून अंदाजे २०० फुटावर विहीर करण्यात आली असून याच विहिरीतून पाईपलाईन पाट मार्गे भोजापूर गावाकडे नेली आहे. तर रोडवरील पुलालगत पाटात काही दिवसाआधी पाईपलाईनवर सिमेंटचा फरस टाकला असून याच फरसावर आदडल्याने श्रीकांत गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.