कुही:- तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहेगाव शिवारात बेजबाबदारपणे दुचाकी चालवून एसटी बसला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी चालकासह दोघे जखमी झाले असून जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
पचखेडी ते डोंगरमौदा दुचाकी ने जात असताना दहेगाव शिवारात दुचाकी क्रमांक एम एच 40 सीबी 9691 या दुचाकी चालकाने ट्रिपल सीट दुचाकी बेजबाबदारपणे चालवून उमरेड वरून पश्चिमेकडे येणाऱ्या एसटी बसला समोरासमोर डाव्या बाजूला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार संदीप फकीरा भूरे, विष्णू गोपाळ ठाकरे , आनंदराव महादेव सेलोटे तिघेही रा. करांडला,ता.कुही जखमी झाले. वेलतुर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रथम जखमींना मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून नागपूर येथील मेडिकल ला रवाना केले.वेलतुर पोलिसांनी अप क्र.१०४/२०२४ कलम २७९,३३७,३३८ भादवि सह कलम १२८(१)१९४(क) मो.वा.का नुसार दुचाकीचालकावर गुन्हा नोंदवून तपासात घेतला आहे.पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात पो.ह.रवींद्र फरकाडे करीत आहे.