कुही तालुक्यातील “यु एंड मी” हॉटेल लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये देहव्यापार अड्यावर पोलिसांची धाड ; अल्पवयीन मुलीची सुटका करून दोघांवर कारवाई

कुही : सध्या तालुक्यात हॉटेल संस्कृती वाढीस लागली आहे.याच हॉटेल लॉजिंग – बोर्डिंगच्या नांवावर कुंटनखाना चालविला जात असल्याचे बुधवारी सायंकाळी उघडकीस आले.यामुळे तालुक्याचे सामाजिक तत्व धोक्यात आले असून नागपूर (ग्रामीण) गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी आंभोरा तीर्थक्षेत्रा जवळील मेंढा येथील “यु अँड मी”हॉटेल लॉजिंग अँड बोर्डिंग वर धाड टाकून दोघास अटक केली.

    यातील आरोपीचे नांव विजय प्रल्हाद मेश्राम (वय ३६ )रा.गोन्हा व हॉटेल चालक सागर चंद्रशेखर कुर्जेकार (वय ३०) रा.वेलतुर असे आहे. दि.१७ जुलैला “यु ॲन्ड मी”हॉटेल लॉजींग मेंढा शिवार ता.कुही येथे आरोपींनी स्वतःच्या
आर्थिक फायदयासाठी पिडीत अल्पवयीन मुलगी हिला आरोपींनी पैशाचे आमिष देवुन देह व्यापारास प्रवृत्त केले.
आरोपी सागर कुर्जेकार रा. वेलतुर यांचे मालकीचे हॉटेल यु ॲन्ड मी हॉटेल लॉजींग मेंढा शिवार मध्ये लोका कडुन पैसे घेवुन चोरी लपविणे अवैधरित्या कुंटनखाना चालवुन अवैध देह व्यापार करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी बातमीची शहानीशा करून फिर्यादी यांनी बोगस ग्राहक पाठवुन रेड केले असता त्या ठिकाणी आरोपी हे अल्पवयीन पिडीत मुली कडुन देह व्यापार करवितांना मिळुन आल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करून तपासावर घेतला आहे.याप्रकरणी अप क्र. ११४/२०२४ कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम सहकलम १४३,३(५) भारतीय न्याय संहिता २०२३, ४, ५ अल्पवयीन न्याय २०१५, १७ बालकांचे लैंगीक अपराधा पासुन संरक्षण करणे या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर व वेलतुरचे ठाणेदार सतीश पाटील पुढील तपास करीत आहे.

आंभोरा हे पर्यटन स्थळ आहे व येथे वैनगंगा पात्रात ‘केबल स्टेड ब्रिज’ झाल्याने दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे.तसेच तालुक्यात नागपूर – आंभोरा मार्गावर अनेक ठिकाणी बेरोजगारांनी हॉटेल्स लावली आहेत. येथे येणाऱ्या हौसे नवसे गौसे तरुणांनी या हॉटेल्सचा गैरफायदा घेत सामाजिक तत्व बिघडविण्याचे काम करीत आहे.असे निदर्शनास येत असून या हॉटेल संस्कृतीवर आळा घालणे गरजेचे आहे.तेव्हा अशाप्रकारे थोड्याशा पैशासाठी हॉटेल मालकांनी तालुक्याचे सामाजिक आरोग्य अबाधित ठेऊन आपला व्यवसाय करावा,अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.