वैरण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार
कुही : बकऱ्यासाठी वैरण आणावयास गेलेल्या एका महिलेवर भरदिवसा ६० वर्षीय नराधमाने अत्याचार केला.ही घटना आवरमारा येथे शेतशिवारात रविवार,दि २५ जुलैला दु.१२ वाजताच्या सुमारास घडली. उपासराव श्रीराम शेंडे, (वय ६०) रा. आवरमारा, ता.कुही असे आरोपीचे नाव आहे. आवरमारा गांवातील पिडीत महीला ही आपली सासु व नवरा यांचे सोबत राहत असून बकऱ्या चारून आपले परिवाराचे उदरनिर्वाह करते यातील आरोपी व पिडीत महीला एकाच गांवचे रहीवासी आहेत.रविवार दि.२५ जुलै रोजी अंदाजे १२ वाजतच्या सुमारास पिडीत आणि पिडीतचा पती हे दोघे शेळया करीता चारा आणन्या करीता शेतशीवारात असलेल्या विटाभट्टीकडे गेले तेव्हा पिडीत हिचे पती दुस-या शेतात गेले असता आरोपीने पिडीत महीलेला एकटी पाहून तिच्यासोबत जबरदस्तीने अत्याचार केला.फिर्यादीचे रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा अप क्र. ११८/२०२४, कलम ६४ (१), ७४, ७४(१)(ii),३३३ भा.न्या.सं.सह कलम ३(१) (w)(i), ३(१)(w) (ii), ३(२),३(v) अनु. जाती आणि अनु. जमाती (अत्याचार प्रतिबंध)अधिनियम नुसार नोंद करून तपासत घेण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी अटक करण्यात आला असुन त्याला न्यायालयाने ०३ दिवस पोलीस रिमांड दिलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार , उमरेड विभाग उमरेड हे करीत आहे.