धक्कादायक ! मुलीनेच साथीदारांच्या मदतीने वडिलांना घातला 50 लाखांचा गंडा.

धक्कादायक ! मुलीनेच साथीदारांच्या मदतीने वडिलांना घातला 50 लाखांचा गंडा.

सूरत येथील साई फायनान्स कंपनीत काम करत असल्याची माहिती दिली. या कंपनीत पैसे गुंतविल्यास बक्कळ नफा मिळण्याचे आमिष दाखविले. सोबतच कमी कागदपत्रांवरही कर्ज मिळत असल्याची माहिती दिली.

नागपूर : व्यवसायासाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी करून मुलीनेच साथीदारांसोबत मिळून वडिलांना 50 लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी महादेव भीमा दुधे (वय 80, रा. शाहाकार लेआऊट, वानाडोंगरी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

 

मीना प्रविण गाडेकर (रा. बाळापूर अकोला), अभय पाटील (रा. इस्माईलपुरा, सांगली), मनीष पुरूषोत्तम उमेरठिया (रा. सूरत), समाधान विठ्ठल कसबे आणि प्रतीभा कसबे अशी आरोपींची नावे आहेत. महादेव हे एमएसईबीत कार्यरत होते. विभागीय लेखापाल पदावरून ते सेवानिवृत्त आहेत. मीना त्यांची मुलगी आहे. त्यांच्या परवानगीशिवाय मीनाने 1999 मध्ये लग्न केले होते. तेव्हापासून बापलेकीत दुरावा होता. दोन वर्षांपूर्वी मीनाच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे मे 2022 मध्ये मीना वडिलांच्या घरी आली.

सूरत येथील साई फायनान्स कंपनीत काम करत असल्याची माहिती दिली. या कंपनीत पैसे गुंतविल्यास बक्कळ नफा मिळण्याचे आमिष दाखविले. सोबतच कमी कागदपत्रांवरही कर्ज मिळत असल्याची माहिती दिली. महादेव यांच्या मुलाला म्हणजेच मीनाच्या भावाला आयुर्वेदिक औषधांचा ठोक व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना मोठी रक्कम पाहिजे होती. ऑगस्ट महिन्यात मीनावरील साथीदारांसोबत वडिलांच्या घरी आली. 50 लाख रुपये गुंतविल्यास 5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते, अशी थाप मारली.

वेळोवेळी घेतले 50 लाख

सप्टेंबर 2022 ते 26 जुलै 2024 पर्यंत आरोपींनी महादेव, त्यांची दुसरी मुलगी, मुलगा आणि त्याच्या मित्राकडून वेळोवेळी एकूण 50 लाख रुपये घेतले. मात्र, कर्ज मिळाले नाही. महादेव यांनी पैसे परत करण्यासाठी दबाव टाकला असता आरोपी टाळाटाळ करू लागले. शेवटी त्रस्त होऊन महादेव यांनी प्रकरणाची तक्रार पोलिसात केली.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

दुसऱ्या घटनेत, पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.