Home नागपूर १० मे पासून नागपुर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील डिजिटल पेमेंट होणार बंद !...

१० मे पासून नागपुर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील डिजिटल पेमेंट होणार बंद ! डीलर्स असोसिएशनचा मोठा निर्णय

१० मे पासून नागपुर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील डिजिटल पेमेंट होणार बंद ! डीलर्स असोसिएशनचा मोठा निर्णय

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार १० मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट (फोनपे, गुगल पे, पेटीएम, डेबिट/क्रेडिट कार्ड) स्वीकारले जाणार नाही, अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने शनिवारी दिली. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

कोव्हिडनंतर देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. जर या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे, संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. परिणामी, इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून, व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे. डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Don`t copy text!