अवैधरित्या  देशी दारूची विक्री करणाऱ्या एकास अटक ; कुही पोलिसांची कारवाई

अवैधरित्या  देशी दारूची विक्री करणाऱ्या एकास अटक ; कुही पोलिसांची कारवाई

 

कुही :- पोलीस स्टेशन कुही हद्दीत येणाऱ्या मौजा निरव्हा येथे शेतातील घरातून अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या एकावर  कुही पोलिसांनी कारवाई केली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुही पोलीस अवैध जुगार व दारू संबंधाने  मोहीम राबवत असताना खात्रीशीर मुखाबिराद्वारे मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार  पोलीस स्टेशन हद्दीतील निरव्हा येथे शेतातील घरात एक इसम विना परवाना देशी दारू बाळगून दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच कुही पोलिसांनी पंचांना बोलावून त्या ठिकाणी गेले असता शेतातील घरातील पहिल्या खोलीत असलेल्या लाकडी खाटेच्या बाजूला असलेल्या पांढऱ्या चुंगडीमध्ये विनापरवाना देशी दारू संत्रा क्र.१ च्या  १८० एमएल च्या १६ नीप आढळून आल्या. पोलिसांनी देशी दारूच्या १८० एमएलच्या १६ नीप प्रत्येकी ७० रुपये प्रमाणे ११२० रुपयांचा माल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी देशी दारूची विनापरवाना अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या अंकुश मेश्राम (वय-३५) रा. निरव्हा, ता.उमरेड याचे विरुद्ध कलम ६५ (ई) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल केला असून हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि स्वप्नील गोपाले, राहुल देवीकर सह कुही पोलिसांनी केली आहे.