कुहीच्या दुरभाष केंद्राच्या नजीक आढळला इसमाचा मृतदेह

कुही :- शहरातील दुरभाष केंद्रानजीक खाली भूखंडावर एका इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली सदर इसम हा तालुक्यातीलच माळणी येथील असल्याचे निष्पन्न झाले.
                                             शिशुपाल जयदेव सहारे (वय 36) रा.माळणी असे मृतकाचे नाव असून त्याला दारूचे व्यसन असल्याचे समजले. मृतक हा गुरुवारी सकाळपासून घरून निघून गेला होता दारूच्या नशेत तो नेहमीच घरून निघाल्यावर 2-3 दिवस घरी येत नसल्याचे समजले. शुक्रवारी (5 जुलै) ला मृतक हा दारूच्या नशेत धुंद होऊन मुख्य मार्ग लगत दुरभाष केंद्राच्या नजीक भूखंडात पडून होता. बराच वेळ होऊनही हालचाल होत नसल्याने स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली लागलीच कुही पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन डॉक्टर मार्फत तपासणी केली असता शिशुपाल हा मृत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असता उत्तरीय तपासणीत शिशुपाल याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पीदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. ओमप्रकाश रेहपाडे करीत आहेत.