कुही तालुक्यातील संजय पेशने ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी
कुही :- जिल्हा परिषद नागपूर तर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री संजय बाबुराव पेशने उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव हे यंदाचे मानकरी ठरले आहेत. कुही तालुक्यातून त्यांची पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनानिमित्ताने 6 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा भव्य सोहळा सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे,उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे,सभापती राजकुमार कुसुंबे ,सभापती मिलिंद सुटे ,सभापती प्रवीण जोध ,सीईओ विनायक महामुनी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पचखेडी शाळेत कार्यरत असताना संजय पेशने यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला. शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेत. क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी केंद्रस्तर, तालुकास्तर ,विभाग स्तर व जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.शाळेत डिजिटल शिक्षण ,प्रयोगातून विज्ञान, आदर्श परिपाठ ,शिष्यवृत्ती वर्ग ,वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा सराव , सांस्कृतिक कार्यक्रम,आर्थिक साक्षरता अशा अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला. डेंगू निर्मूलन जनजागृती,रक्तदान, विविध मंडळांद्वारे आयोजित कार्यक्रम अशा सामाजिक कार्यातूनही त्यांनी आपला कार्याचा ठसा उमटविलेला आहे.
यावेळी सभापती वंदनाताई मोटघरे, उपसभापती ईश्वर तळेकर, जि.प.सदस्य प्रमिलाताई दंडारे, वामनजी श्रीरामे, जयश्री कडव, संदीप खानोरकर, गटविकास अधिकारी डॉ. स्वप्निल मेश्राम, गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील, विस्तार अधिकारी गणेश लुटे ,अशोक बांते, केंद्रप्रमुख मनोज बोरकर ,महेंद्र दापूरकर ,महेंद्र धारगावे, प्रचिती गभने, मुख्याध्यापक सुषमा सपाटे ,योगिता धोंडे, सपना तुमसरे ,किरण देवघरे, सुधीर वाढई,गोविंदा ननावरे, गोदरू दहीलकर, रफिक शेटे ,प्रवीण फाळके, मनोहर वाघ, कैलास बावनगडे, अशोक माहूरकर, चंद्रकांत कुंभारे, राजू यावलकर, अरविंद बावनकुळे,आतिश कोहपरे, प्रदीप मोहोड, सुरज वैद्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगला खडसे, चिंतामण भुजाडे, चरण शेंडे, पिंटू भुजाडे, विजय भुजाडे व सर्व गावकरी यांनी अभिनंदन केले.