त्या गंभीर जखमीने घेतला अखेरचा श्वास ; मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणे जीवावर बेतले

त्या गंभीर जखमीने घेतला अखेरचा श्वास 

मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणे जीवावर बेतले

कुही :- शनिवारी कुही वरून अंत्यविधी आटोपून गावी परत जात असताना सासरे जावई यांचा दुचाकीचा  कुही-उमरेड मार्गावर आपतूर शिवारात  विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मिनी ऑईल टँकर सोबत समोरासमोर जबर धडक झाली. यात सासऱ्याचा काल अपघातस्थळीच मृत्यू झाला तर जावयावर नागपूर येथे उपचार सुरु होते. यात आज उपचारादरम्यान जावयाचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कुही पोलीस स्टेशन हद्दीतील आपतूर शिवारात कुही-उमरेड मार्गावर मोटारसायकल क्र. एमएच ३४ सीजी ४३५५ या दुचाकीने नितेश प्रभाकर डहारे (वय-३५) रा.बाळापुर , ता.नागभीड ,जि.चंद्रपूर  व ढेकलु आगरे (वय-६५) रा.चांदापूर, ता.मुल,जि.चंद्रपूर हे कुही येथून अंत्यविधी आटोपून गावी परत जात असताना विरुद्ध दिशेने उमरेड वरून येणाऱ्या एमएच ३१ एक्सएल ६०१७ क्रमांकाच्या ऑईल टँकर सोबत समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार ढेकलु आगरे (वय-६५) रा.चांदापूर, ता.मुल,जि.चंद्रपूर याचा जागीच मृत्यू झाला होता. तर नितेश प्रभाकर डहारे याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. मात्र आज त्यानेही हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार  दुचाकीचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने निष्काळजीपणाने  भरधाव दुचाकी चालवून ऑईल टँकरला जबर धडक दिली. व यात काल सासरे ढेकलु आगरे व आज नितेश प्रभाकर डहारे या दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.