परिस्थितीवर मात करून अतकरी भावंडांनी गाठलं यशाच शिखर.
कुही तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधीत ब्राह्मणी गावचे रहिवासी
कुही :- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे! म्हणजे माणसाने एखादी गोष्ट करायचीच अस ठरवल तर तो असाध्य गोष्ट साध्य करु शकतो. कुही तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधीत ३० घरांची वस्ती असलेला ब्राह्मणी ह्या गावातील अनिल यशवंता अतकरी, सुरज यशवंता अतकरी व खेमराज धनराज अतकरी या एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी ‘नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे ज्युनियर क्लर्क भरती 2024’ परिक्षेत यश संपादन केले.

नुकत्याच आलेल्या निकालानुसार अतकरी भावंडांची निवड झाली आहे. प्रकल्पबाधित सर्वसाधारण कुटुंबात जन्म झालेल्या मुलांनी जिद्द आणि कठोर मेहनतीने यश संपादन केले. त्यामुळे ते गावातील व परिसरातील ईतर मुलांसाठी प्रेरणा ठरले आहेत. अतकरी भावंडांचे प्राथमिक शिक्षण ब्राह्मणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर पुढील शिक्षण भारतीय ज्ञानपीठ शाळा फेगड आणि पचखेडी येथील मुकुंदराजस्वामी कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयात झाले असून नागपूरला दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून यश मिळवले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक व वेळोवेळी सहकार्य करणा-या मित्रांना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल सप्तखंजेरीवादक आकाश टाले, इंजि. रमाकांत शेंडे, तलाठी गोपाल नान्हे,सौरभ घरडे, नंदकिशोर चुधरी, मंगेश काकडे, यशवंत काकडे, गौतम गडपायले,नरहरी नान्हे, चेतन भोयर,धम्मपाल धारकाने, संकेत रेहपाडे आदींसह परिसरातून अभिनंदन होत आहे.



