लोखंडी तरापे चोरणारे गजाआड ; रात्र गस्तीत संशयास्पद दिसून आल्याने कारवाई
कुही :- कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा-धानोली येथील लोखंडी तराफे चोरणार्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी उमेश ताराचंद गोडे रा. धानोली हे विहीर बांधकामाचे कंत्राटदार असून त्यांच्या घरासमोर नेहमी विहीर बांधकामाचे तराफे ठेवेलेले असतात. शुकवारी अज्ञात चोरांनी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत गोडे यांच्या घरासमोरील 10 लोखंडी तराफे गायब केल्याचे गोडे यांना शनिवारी सकाळी दिसून आले. लागलीच गोडे यांनी कुही पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.

कुही पोलिसांनी तपासाची यंत्रे फिरवताच शुक्रवारी मध्यरात्री रास्त गस्त घालत असलेल्या मौदा पोलिसांना एक संशयास्पद चारचाकी वाहन आढळून आल्याची माहिती होती. कुही पोलिसांनी मौदा पोलीस ठाण्यात जाऊन पडताडणी केली असता संबंधित संशयास्पद वाहनात गोडे यांचे येथून चोरी गेलेले तराफे असल्याचे निष्पन्न झाले. कुही पोलिसांनी आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपीकडून चोरी गेलेले 10 लोखंडी तराफे सह चोरीत वापरलेली चारचाकी मालवाहू गाडी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी आरोपी रविकिरण शाहू, पंकज शाहू, गयाप्रसाद शाहू, अंकित शाहू, लल्लू शाहू व संजय शाहू सर्व रा. कळमना,नागपूर यांचेविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शात उपपोनि स्वप्नील गोपाले, पोह. ओमप्रकाश रेहपाडे,पो.शि.अनिल करडखेडे,पो.शि. राहुल देवीकर करत आहेत.



