तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच ; वाहन अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच

वाहन अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

कुही:- कुही ते वदोडा मार्गावर अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचे लाईट डोळ्यावर आल्याने दुचाकी काम सुरू असलेल्या रस्त्यावर जाऊन स्लिप झाल्याने यात जखमी सेवानिवृत्त शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

काही दिवसांपासून कुही ते वदोडा मार्गाची डागडुजी सुरू आहे. त्यामुळे काही ठिकानी दोन्ही मार्गांची वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार (दि.11) शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कुही-वदोडा मार्गावर वदोडा वरून कुही कडे येत असताना सावळी गावानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचे लाईट झगमगाट एकाएक डोळ्यावर पडल्याने समोरचे काहीच दिसेनासे झाले.शिवाय एन एका बाजूला संपूर्ण रस्ता ब्रेकरने फोडून दगड बाहेर काढल्याने गाडी  रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन धडकत स्लिप झाली यात कुही येथील सर्वोदय विद्यालय येथील सेवानिवृत्त शिक्षक मधुकर येळणे हे जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तात्काळ कुही येथील ग्रामिण रुग्णलयात दाखल केले व तेथून नागपूर येथे रेफर करण्यात आल्या. त्यात नागपूर येथील शासकीय हॉस्पिटल मेडिकल येथे गंभीर जखमी येळणे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

विशेष म्हणजे येळणे  गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे.मात्र पाहिजे त्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था नसल्याने दुरुस्तीच्या कामापासूनच रस्ता अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या महिन्याभरात कुही ते वदोडा मार्गावर अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू तर काही गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाले आहे.