गोठ्यात बांधलेला बकरा पळविला ; कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कुही:– पोलीस ठाणे कुहीच्या हद्दीत येणाऱ्या मौजा-कोलारमेट येथे गोठ्यात बांधलेला बकरा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी राजकुमार सराटे (वय 24) रा. कोलारमेट यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादीचे वडील वामन सराटे यांनी घरासमोरील गोठ्यात शेळी व बकरे बांधून ते झोपले गेले. पहाटे 4 च्या सुमारास फिर्यादीचे शेजारी राहणारे त्यांचे काका यांना फिर्यादी यांचे गोठानजीक चारचाकी वाहन दिसून आले. फिर्यादी यांच्या काकांना पाहताच चारचाकी निघून गेल्याने फिर्यादीचे काका यांनी फिर्यादी व त्यांचे वडील यांना उठवून याची माहिती दिली. फिर्यादी व त्यांचे वडील यांनी गोठ्यात जाऊन पाहणे केली असता गोठ्यात बांधलेला २० किलो वजनाचा काळ्या पांढऱ्या रंगाचा बकरा चोली गेल्याचे समजले. फिर्यादी यांचे तक्रारीवरून कुही पोलिसात अज्ञात बकरा चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. सुधीर ज्ञानबोनवार करीत आहेत.