वळण घेताना इंडिकेटर न दिल्याने दोन वाहनांचा अपघात
अपघातात 9 जण जखमी
कुही :– कुही ते मांढळ मार्गावर चीपडी नजीक जीनिंज जवळ दोन वाहनांचा अपघात झाला असून या अपघातात 9 जन जखमी झाले असून जखमींना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

कुही ते मांढळ मुख्य मार्गावर चीपडी नजीक कल्पना जिनिंग नजीक कुही वरून मांढळ कडे जात असलेला चारचाकी मालवाहू वाहन क्र. एमएच २९ एफ ४४६५ च्या वाहनाने जिनिंग कडे जाताना कुठलेही सूचक (इंडिकेटर) न देताच अचानक वळण घेतल्याने मागून येणारी खासगी प्रवासी वाहतूक करणारा वाहन क्र. एमएच ४० पी ३४४८ सोबत धडक झाली. दोन्ही वाहनांतील लोक जखमी झाले असून यात प्रज्वल मडावी (१८) रा. पचखेडी, सोहम मांढरे (10) रा. तारणा, भावेश रोहणकर(१७) रा.तारणा , स्वप्नील डोंगरे (२४) रा. वडेगाव, सचिन बांते (३८) रा.वडेगाव , प्रदीप मोटघरे (50) रा. हरदोली, सविता शेंदरे (३९) रा. वेळगाव, संगीता लांजेवार (२५) रा. मांढळ, सुनिता खडसे (४५) रा. पारडी (वग) आदी जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.



