वेलतूर येथील ३५ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू
कुही :– तालुक्यातील पचखेडी शिवारात अपघात झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्य झाला आहे.
अनुप सुरेश पडोळे (वय ३५) रा.वेलतूर असे मृत युवकाचे नाव असून तो मंगळवारला (दि.१४ मे) लग्न समारंभ आटोपून वेलतूर येथे दुचाकीने परत येत असताना पचखेडी शिवारात त्याचा वाहनाला अपघात झाला. त्याला प्रथम मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून नंतर नागपूर मेडिकल येथे उपचाराकरिता दाखल केल्याची माहिती आहे. त्यात उपचारादरम्यान आज (बुधवारी) सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुही तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.