ज्या राजकारणाचा समाजाला फायदा नाही ते राजकारण बिनकामाचे ; मांढळच्या आरोग्य शिबिरात माजी आ. राजूभाऊ पारवेंचे प्रतिपादन

ज्या राजकारणाचा समाजाला फायदा नाही ते राजकारण बिनकामाचे

मांढळच्या आरोग्य शिबिरात माजी आ. राजू भाऊ पारवेंचे प्रतिपादन

 

कुही :- लोकच आपल्याला राजकीय पदावर बसवतात. पण ते राजकीय पद हे फक्त मिरवण्यासाठी नसते तर त्यातून समाजाचा फायदा होणे अपेक्षित असते. अन्यथा असे राजकारण बिनकामाचे ठरते असे प्रतिपादन माजी आ. राजूभाऊ पारवे यांनी केले.

 

मांढळ येथे मंगळवारी (दि.१६) राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी आ. राजू भाऊ पारवे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच सोनुताई निरगुडकर, पं. स. सदस्य मंदा डहारे, संजय निरगुडकर, सुनील किंदरले, खुशाल डहारे, विनोद तिजारे, मनोज पंचबुधे, कुंडलिक राऊत, आकाश भोयर, दीपक डहारे, राजेंद्र अवदुत, डॉ. पांडे मॅडम, डॉ. दीपक रहांगडाळे, डॉ. आसिफ शेख, डॉ. प्रतिमा बोपचे, श्री. दरवडे, आदी मान्यवरांची विचारमंचावर उपस्थिती होती.

आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. नेत्र तपासणी, रक्त तपासणी, इसिजी यासह इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला. चारशेहून अधिक रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले. या आरोग्य शिबिरात अनेकांनी रक्तदानही केले.

उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे म्हणाले की, मी स्वतः गरिबी अनुभवलेली आहे. मी देखील अडचणींचा सामना करत पुढे आलेलो आहे. त्यामुळे सर्व परिस्थितीची जाणीव मला आहे म्हणूनच आपण गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य शिबीर घेतो. यातून अनेक गरजूंना फार मोलाची मदत होते. तसेच शिबिराच्या व्यतिरिक्त देखील शेकडो रुग्णांना आपण मोठी मदत करण्याचे कर्तव्य पार पाडले असून यापुढेही आपण कोणत्याही परिस्थितीत गरजुंच्या मदतीला येऊ असे राजू पारवे म्हणाले. गावासाठी योगदान देणारे पोलीस पाटील व जोखीम घेऊन सेवा करणारे वीज कर्मचारी यांच्याबद्दल राजूभाऊंनी कृतज्ञता व्यक्त केली. राजू भाऊंच्या हस्ते मोमेंटो व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र अवदुत व योगेश पडाळे यांनी अनेक योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. लाडकी बहिण सह इतर योजनांसाठी नाव नोंदणी करण्याकरिता यावेळी मोठी गर्दी झाली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन युवराज करनुके यांनी केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.