सामाजिक कार्यकर्ता प्रमोद घरडे यांचे नाव मतदार यादीतून गायब ; दुसऱ्या विधानसभेच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न

सामाजिक कार्यकर्ता प्रमोद घरडे यांचे नाव मतदार यादीतून गायब 

दुसऱ्या विधानसभेच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न

कुही :-  महायुतीत रामटेकची जागा शिंदेसेनेला सुटल्यानंतर उमरेडची जागा भाजपला सुटेल जवळपास निश्चित आहे. उमरेडमध्ये भाजपमधून इच्छुकांची संख्याही अधिक आहे. अशातच उमरेड मतदारसंघातील भाजप इच्छुक प्रमोद घरडे यांचे नाव पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथील मतदार यादीत स्थानांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

                                याप्रकरणी घरडे यांनी कुही पोलिसांत तक्रार दाखल करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. घरडे हे मूळचे कुही तालुक्यातील साळवा येथील राहणारे आहेत. त्यांचे नाव उमरेड मतदारसंघातील मतदार यादी क्रमांक २५९ मध्ये आहे. मात्र, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे नाव पुणे जिल्ह्यातील मौजा- वडगाव (शेरी)येथील स्थानांतरित करीत असल्याची माहिती घरडे यांना साळवा  गावाच्या पोलिस पाटलाकडून मिळाली. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीने मतदार यादीतील नाव दुरुस्ती स्थानांतरित करण्याचा केलेला अर्ज तातडीने रद्द करण्याची मागणी घरडे यांनी पोलिस तक्रारीत केली आहे. घरडे यांच्या तक्रारीनंतर उमरेडचे उपविभागीय अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी यांनी वडगाव शेरी येथील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पत्र पाठवत घरडे यांचे नाव पुण्यात स्थानांतरित करण्याबाबतचा अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे