अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
मृत्यूचे कारण अद्याप निश्चित नाही
कुही :- कुही पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा उंद्री ते सुरगाव मार्गावर रस्त्याच्या बाजूने एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

मौजा उंद्री ते सुरगाव दरम्यान मुख्य मार्गावर बुधवारी (दि. 15/01/2025) रस्त्याच्या कडेला एका मोबाईल कंपनीच्या केबल करिता नालीचे खोदकाम करण्यासाठी पाहणी करण्याकरिता गेलेल्या लोकांना तेथे रोडच्या वाजुला नालीमध्ये एका अनोळखी पुरुषाचे मृतदेह वय अंदाजे 30-35 वर्ष हा मृत अवस्थेत पडलेला दिसला. लागलीच त्यांनी याची कुही पोलिसांना दिली. पोलिसांनी घटना स्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता नागपूर येथील मेडीकल काँलेज येथे पाठविला. सदर मृतकाच्या अंगामध्ये काळ्या रंगाची फुल बाह्याची टि-शर्ट व काळपट रंगाचा साधा पँन्ट घातलेला होता. याप्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस करत आहे.



