तालुक्यात उद्या १८ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा ; ५००+ पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार

तालुक्यात उद्या १८ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा ; ५००+ पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार

कुही :- तालुक्यातील श्री. लेमदेव पाटील महाविद्यालय, मांढळ येथे  दि. १८ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २०२५ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर, मॉडेल करिअर सेंटर नागपूर तसेच श्री.लेमदेव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा मेळावा स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळविण्यासाठी मोठा फायदा करून देणार आहे.

                 हा रोजगार मेळावा १८ सप्टेंबर ला सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार असून ५०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना या मेळाव्यात संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये १० वी पासून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले तसेच डिप्लोमा किंवा आयटीआय (ITI) धारक प्रवीण उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल.

  • सहभागी कंपन्या

या मेळाव्यात नामांकित कंपन्या व संस्थांचा सहभाग असून उमेदवारांना विविध क्षेत्रात संधी मिळणार आहे. सहभाग घेणाऱ्या नियोक्त्यांमध्ये वैभव एंटरप्रायझेस, एसबीआय सी-मनिष नगर, प्रोव्हिन्शियल लाइफस्टाईल, सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (MIHAN, नागपूर), मुथूट मायक्रोफायनान्स, क्वेसकॉर्प लि. , एफीमेन सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे. या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा www.ncs.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन नोंदणी करावी.  हि रोजगारासाठी सुवर्ण संधी असून  बेरोजगार उमेदवार, स्थानिक युवा, पदवीधर व प्रशिक्षणार्थींसाठी रोजगार मेळावा ही एक सुवर्णसंधी असून विविध क्षेत्रातील रोजगार मिळवून देणारा हा उपक्रम ठरणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत श्री. लेमदेव पाटील महाविद्यालय, मांढळचे प्राचार्य  प्रा. डॉ.नवनीत लांबा यांच्यासह  आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.