दारुड्या मुलाच्या मारहाणीत वृद्ध आईचा मृत्यु

दारुड्या मुलाच्या मारहाणीत वृद्ध आईचा मृत्यु

कन्हान : पोलीस सुत्रांद्वारे प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सौ.रिंकू मूकेश मेश्राम वय ३५ वर्ष रा. प्रगती नगर सुपर टाउन कन्हान यांची आई मृतक ग.भा. मनोरमा जगन शेंडे वय ६० वर्ष ही कोळसा खदान नं. ६ येथे तिचा लहान भाऊ रीतेश उर्फ सोनु जगन शेंडे वय ३२ वर्ष. याचे सोबत राहत होती. रिंकूच्या आईचे घरा शेजारी राहणा-या मावशी मंगला अशोक कांबळे हीची प्रकृती ठीक नसल्याने ती मागील दिड महिन्या पासुन आईकडे येऊन मावशीचे घरी राहत आहे. रिंकूचा लहान भाऊ रितेश मजुरीचे काम करतो. त्याला अगोदर पासुन दारू पिण्याचे व्यसन आहे.

रात्री ११ वाजता दरम्यान रिंकू मावशीचे घरी आराम करित असतांना तिला आईचा ओरडण्याचा आवाज आला. ती बाहेर आली तर तिचा लहान भाऊ रीतेश आईला मारहाण करित होता. तिने आईला भावाचे तावडीतुन सोडवुन कन्हान पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास आली. पोलीसांनी आईची तक्रार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे मेडीकल करिता पाठविले. डॉक्टरांनी उपचार करून औषध दिली रिंकू आईला रात्री ३ वाजता घरी घेऊन आली. आईला घरी झोपविले आणि बाजुला मावशीचे घरी झोपली.

रविवारला सकाळी ७ वाजता आईने रिंकूला आवाज दिला. तर आईने दवाखान्यात घेवुन चल पोटात खूप दुखत आहे. म्हणत होती. आईला दवाखान्यात घेवुन जाण्यासाठी ऑटो पाहायला गेली. ऑटो न भेटल्याने ती ८.३० वाजता घरी परत आली. तेव्हा आजुबाजुचे लोक जमलेले होते. लोकांनी आई मरण पावल्यांचे सांगितले. लहान भावाने आईला मारहाण केली. त्यातच ती जख्मी झाली व तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी रिंकू मेश्राम यांचा तक्रारी वरून आरोपी रितेश ऊर्फ सोनु जगन शेंडे याला अटक करून त्याचे विरुद्ध हत्तेचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात  कन्हान पोलीस करित आहे.