अवैध मोहफुल दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल  ; कुही पोलिसांची कारवाई

अवैध मोहफुल दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल  ; कुही पोलिसांची कारवाई

 

कुही :- कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा-बोडकीपेठ येथे गावठी हातभट्टीची मोहफुलाची दारू घेऊन सवारी गाडीतून वाहतुकीसाठी उभ्या असलेल्या व्यक्तीवर कुही पोलिसांनी कारवाई केली आहे.

कुही पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना खात्रीशीर बातमीदाराकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुही ते चापेगडी मार्गावरील बोडकीपेठ बस स्थानकावर दारू विक्रीसाठी एक इसम गावठी हातभट्टीची मोहफुलाची दारू घेऊन  उभा असल्याची माहिती मिळाली. लागलीच कुही पोलिसांचे पथक पंचासह तेथे पोहचले. तेथे  एक इसम हातात एक पांढऱ्या रंगाची चुंगडी घेऊन उभा होता. पोलिसांनी त्याला नाव व हातातील चुंगडित काय आहे असे  विचारले असता त्याने अक्षय मनोज घरडे (वय-२९), रा. वार्ड क्र.2 ,शहापूर, भंडारा असे नाव असून हातातील चुंगडित गावठी हातभट्टीची मोहफुलाची दारू  असून टो दारू घेऊन सवारी गाडीची वाट पाहत उभा असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष चुंगडितील  गावठी हातभट्टीची मोहफुलाची दारूची तपासणी केली असता त्यात रबर ट्यूब मध्ये ३० लिटर दारू प्रत्येकी 50 रुपये लिटर प्रमाणे १५०० रुपयांचा माल मिळून आला. पोलिसांनी आरोपी अक्षय मनोज घरडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनास्थळीच जप्त केलेल्या मालाची विल्हेवाट लावली आहे.

हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्नील गोपाले, पोह. ओमप्रकाश रेहपाडे, अनिल करडखेडे, राहुल देवीकर यांनी केली आहे.