आंभोरा मार्गे येणारा अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला
महसूल विभागाची कारवाई
कुही:- भंडारा जिल्ह्यातून आंभोरा पुलाच्या मार्गावरून कुही तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तालुका महसूल विभागाने कारवाई केली असून ट्रक मुद्देमालासह वेलतुर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

तालुका महसूल प्रशासनाने अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंभोरा केबल पूल मार्गे भंडारा जिल्ह्यातून कुही तालुक्यात रेती वाहतूक होत असल्याच्या अनेक चर्चा आहेत. त्यात शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास महसूल विभाग पेट्रोलिंग करत असताना आंभोरा पूल मार्गे कुही तालुक्यात रेतीची वाहतूक करणारा ट्रक दिसून आला.लागलीच ट्रक थांबवून चालकाला ट्रकमधील रेतीच्या परवान्याची विचारणा केली असता अवैध परवाना नसल्याचे दिसून आले. महसूल पथकाने संबंधित अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून मिळून आलेला ट्रक वेलतुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई कुहीचे तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्या उपस्थितीत महसूल विभागाने केली असून या कारवाईसाठी वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांनी विशेष सहकार्य केले.


