भरदिवसा दुचाकी पळवली ; कुही शहरातील मुख्य मार्गावरील घटना
कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कुही:- शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर एका गॅरेजमध्ये दुरुस्ती करण्यासाठी टाकलेली दुचाकी (होंडा शाईन) भरदिवसा चोरट्यांनी पळवली.दुचाकी मालकाच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांविरोधात कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नागपूर आंभोरा मुख्य मार्गावरील लक्ष्मी मंगल कार्यालसमोर असलेल्या एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये गाडीमालक मोहन धोटे (वय-32) रा.कुही यांनी त्यांची एमएच ४० ए एल २९२४ क्रमांकाची होंडा शाईन दुरुस्ती साठी टाकली होती. गॅरेजमालक यांनी दुचाकी दुरुस्त करून गॅरेजसमोर चाबी लाऊन उभी ठेवली होती. व ते इतर दुचाक्या दुरुस्त करण्याकामी लागले. त्याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी चाबी लावलेली दुचाकी गॅरेजसमोरून पळवली. गाडीमालक मोहन धोटे यांच्या तक्रारीवरून कुही पोलिसांत अज्ञात दुचाकी चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास कुही पोलीस करत आहेत