भाजपाच्या कुही मंडळात निखिल येळणे तर मांढळ मंडळात डॉ.विनोद जुवार यांची नियुक्ती

भाजपाच्या कुही मंडळात निखिल येळणे तर मांढळ मंडळात डॉ.विनोद जुवार यांची नियुक्ती

कुही:- रविवारी नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नव्याने संरचीत सर्कलनिहाय मंडळ अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात कुहीचे नगरसेवक निखिल येळणे यांची कुही मंडळ व डॉ.विनोद जुवार यांची मांढळच्या मंडळ अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या संघटन दृष्ट्या तालुक्यात तालुका अध्यक्ष वगळता प्रत्येकी दोन सर्कल म्हणून एक मंडळ तयार करण्यात आला. त्यात कुही नगरपंचायत क्षेत्र, जिल्हा परिषद सर्कल राजोला व जिल्हा परिषद सर्कल सिल्ली-तितुर मिळून कुही मंडळ तयार करण्यात आला आहे. तर मांढळ जिल्हा परिषद सर्कल व वेलतुर जिल्हा परिषद सर्कल मिळून मांढळ सर्कल तयार करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही मंडळांमध्ये भाजपच्या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात मंडळ अध्यक्ष म्हणजे तालुका अध्यक्ष पदासाठी नावे मागविण्यात आली होती. त्यात तालुक्यातील अनेक दिग्गजांची नावे इच्छुकांच्या यादीत होती. अखेर कार्यकर्त्यांच्या निवडीतून व संघटनात्मक कार्य पाहता कुही मंडळ अध्यक्ष म्हणून कुहीचे नगरसेवक निखिल येळणे यांची निवड करण्यात आली.तर मांढळ मंडळ मधून डॉ.विनोद जुवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे..