अतिप्रसंगातून अल्पवयीन गर्भवती ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कुही:– घरी कुणीही नसल्याचे हेरून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. या अतिप्रसंगातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहली. या प्रकरणी आरोपी नातेवाईकाविरोधात कुही पोलिसांनीगुन्हा नोंद केला आहे.
अनिल निशाने (21) रा. मोहखेडी ता. मौदा जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अल्पवयीन मुलीच्या काकूचा आतेभाऊ आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये पीडित मुलीच्या घरी कुणीही नसल्याचे हेरून आला. दरम्यान त्याने पीडितेसोबत दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर हळू हळू पोट फुगल्याने सोमवारी (दि. 19) पीडिता तिच्या आईसोबत उमरेड येथील खाजगी रुग्णालयात गेली. तेथील डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेने आई व मामासह उमरेड पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. प्रकरण कुही पोलिस स्टेशन हद्दीतील असल्याने प्रकरण कुही येथे वर्ग करण्यात आले. कुही पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात कलम 376 (2) (एन), 376 (3)भादंवी सहकलम 4, 6 पोक्सोअन्वये गुन्हा नोंद केला.