दोन दिवसांनी पुन्हा मुसळधार पाऊस ? ; २४ तारखेला पाऊसाचा ईशारा !

दोन दिवसांनी पुन्हा मुसळधार पाऊस ? 

२४ तारखेला मुसळधार पाऊस !

 

नागपूर : सप्टेंबरचा दुसऱ्या आठवडा लोटला आहे, आतापर्यंत मान्सूनचे ढग शांत आहेत. अशात हवामान विभागाने पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. सोबतच २४ सप्टेंबर रोजी नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.ऑगस्ट महिन्यानंतर पावसाने दडी मारल्याने शहरातील तापमान ३५.५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. ते सामान्य तापमानापेक्षा ३ डिग्रीने अधिक आहे. त्यामुळे नागपूरकर तापमानाने हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २३ सप्टेंबर रोजी बंगालच्या खाडीमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनसोबतच कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्या कारणाने पुन्हा एकदा मध्यभारतातील काही भागात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. जर मान्सूनची रेषा दक्षिणेकडे सरकल्यास पुन्हा विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भात बहुतांश भागात पावसाने सरासरीचा आकडा पार केला आहे.