कुही पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी

कुही :- कुही पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या चांपा येथे अज्ञात चोरट्यांनी  मध्यरात्री घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून नगदी रकमेसह सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली असून कुही पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अभिमन्यू भगवान खोंडे रा. वार्ड क्र.3, चांपा येथे पत्नी व मुलासह राहत असून यांचा गावीच चहा नास्ताची दुकान आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी हि बुद्धगया येथे गेली असून घरी कुणी नसल्याने त्यांच्या मुलीला  त्यांनी घरी राहायसाठी बोलावून घेतले आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यावर घरातील सर्व जन घराला कुलूप लाऊन घराच्या छतावर झोपायला गेले. दरम्यान मध्यरात्री 2.३० च्या सुमारास उठून खाली आले असता घराचे कुलूप होते.मात्र पहाटे ५.३० च्या दरम्यान उठून खाली आले असता घराचे कुलूप तुटून पडले होते. घरात जाऊन पहिले असता घरातील घरातील लोखंडी कपाट तुटले होते. कपाटात नुकतेच कापूस विकून मिळालेले 1 लाख ४० हजार व मुलीचे 10 हजार असे 1 लाख 50 हजार रुपये तसेच पत्नीचे सोन्याचे मंगळसुत्र पदकासह ५ ग्रॅम वजनाचे जुने वापरते अंदाजे एकुण किंमत २०,०००/-रु. मुलगी योजना हिचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक असलेले मंगळसुत्र जुने वापरते अंदाजे एकुण किंमत २०,०००/- रु.,५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या एकुण १० ग्रॅम वजनाचे अंदाजे एकुण किंमत ४०,०००/-कानातले सोन्याचे दोनजोड त्यातील एक जोड ५ ग्रॅम वजनाचा व दुसरा जोड २ ग्रॅम वजनाचे एकुण ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे जोड अंदाजे एकुण किंमत २८,०००/- रु. गौतम बुध्दाचे मुर्ती असलेले ०२ सोन्याचे लॉकेट प्रत्येकी ०२ ग्रॅम वजनाचे एकुण ०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट अंदाजे एकुण किमत १६,००० /- रु. सोन्याचे जुन्या काळातले खडे असलेली ०२ ग्रॅम वजनाची नथ किमत ८०००/- रु.असे नगदी १,५०,०००/- रु व वरील वर्णनाचे सोन्याचे एकुण ३३ ग्रॅम वजनाचे १,३२,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागीणे असा एकूण २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे  दिसून आले. फिर्यादी यांचे तक्रारी वरून कुही पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भादवी ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि देविदास ठमके करत आहे.

 फिर्यादी खोंडे  यांनी अंदाजे सात ते आठ दिवसापुर्वीच  शेतातील २० क्विंटल कापुस विकला असल्याने त्याचेच  १,४०,०००/- रु.आले होते व ते घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवले होते. मात्र चोरट्यांनी त्याच्यावर डल्ला मारल्याने खोंडे यांची वर्षभराची मेहनत चोरट्यांनी रात्रभरात उडवली आहे.