आंभोरा: महाशिवरात्री निमित्य तीन दिवसीय भव्य वैनगंगा महोत्सवाचे आयोजन

आंभोरा: महाशिवरात्री निमित्य तीन दिवसीय भव्य वैनगंगा महोत्सवाचे आयोजन

वैनगंगेतीरी मनोहर अंबानगरी तेथे प्रगटले श्रीहरी जगदीशस्वरू अशा पावन आंभोरा नगरी येथे पाच नद्यांच्या संगमावर विराजमान श्री चैतन्येश्वर देवस्थान येथे दर वर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. याच यात्रेत गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय किसान क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर दंडारे यांनी तीन दिवसीय वैनगंगा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या मध्ये रात्री ६ वाजता गंगा आरती तर रात्री ८ वाजता भाविक भक्तांच्या मनोरंजनाकरिता संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २६ फेब्रुवारीला चव्हाण ब्रदर्स यांचा लाइव्ह भक्तिमय म्युजिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.

सुरांची मैफिल गाजवत तरुणाईला आपल्या आवाजावर थीरकवनारे महाकाल सरकार फेम श्री. सनीजी अलबेला यांचा भजन गायनाचा कार्यक्रम २७ ला आयोजित करण्यात आला आहे. तर २८ ला ह.भ.प. रुपालीताई सवने (परतुरकर) यांचे भव्य दिव्य काळजाला भिडणारे कीर्तन आयोजित केले आहे. मागील वर्षी वैनगंगा महोत्सवाच्या कार्यक्रमात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. या वर्षीच्या वैनगंगा महोत्सवाचे उद्घाटन अनंत श्री विभूषित द्वारका शारदा एवं जोशी मठ पिठाधीश्वर परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री प्रज्ञानंद सरस्वतीजी महाराज तसेच केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रमुख अतिथि म्हणून आमदार कृपाल तुमाने, राज्यमंत्री आशिषजी जैस्वाल, तर राजे मुधोजी भोसले व विहिपचे मिलिंदजी परांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रात केवळ आंभोरा येथे होणाऱ्या या भव्य वैनगंगा आरती कार्यक्रमाला गेल्यावर्षी पेक्षाही जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवण्याचे आवाहन राष्ट्रीय किसान क्लब व वैनगंगा महोत्सव समितीचे अध्यक्ष नंदकिशोर दंडारे, उपाध्यक्ष कमलेश ठवकर, सचिव निलेश दंडारे सह समितीच्या सदस्यांनी केले आहे.