सूर्याभोवती तो रिंगण आहे तरी काय ?

सूर्याभोवती तो रिंगण आहे तरी काय ?
तालुक्यात पाहायला मिळाले सूर्याभोवती रिंगण..

कुही :- मंगळवारी नागरिकांना आकाशात वेगळेच चित्र अनुभवायला मिळाले ते म्हणजे सूर्याभोवती गोलाकार रिंगण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याला “हेलो इफेक्ट” म्हणतात यात सूर्याच्या भोवती इंद्रधनुष्याप्रमाणे एक रिंगण तयार होते.
तालुक्यात ठिकठिकाणी लोकांना हे सूर्याभोवती रिंगण पाहायला मिळाले असून अनेकांनी याचे फोटो काढून सोशल मिडीयावर पोस्ट केली असून याबाबत अनेकजण विविध तर्क-वितर्क काढत असल्याचे दिसून आले.

कशामुळे तयार होतो “सन हॅलो” ?
– ही खरंतर एकदम साधारण घटना आहे. वातावरणात असलेल्या हेक्सागोनल क्रिस्टलमुळे असं होतं. वातावरणातील पाण्याच्या षटकोनी कणांवर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्यातून होणाऱ्या रिफ्लेक्शनमुळे असा इफेक्ट दिसतो.

दुर्मिळ असतात घटना
“हॅलो” म्हणजे प्रकाशाने किंवा एनर्जीने तयार झालेली एखादी गोलाकार आकृती. यामुळेच या घटनेला “सन हॅलो” म्हणतात. अशी घटना घडण्यासाठी सूर्याचा पृथ्वीशी एक विशिष्ट कोण (22 डिग्री) असणंही गरजेचं असतं. यासोबतच हवेत पुरेशी आद्रता असणे हि आवश्यक असते. यामुळे या घटना अगदी दुर्मिळ असतात.