ट्रकची दुचाकीला कट ; चाकात येऊन महिलेचा मृत्यू

ट्रकची दुचाकीला कट

चाकात येऊन महिलेचा मृत्यू

कुही:- तालुक्यातील प्रसिद्ध आंभोरा देवस्थान येथून देवदर्शन करून नागपूरला परत जात असताना उमरेड-नागपूर मार्गाजवळ कुही फाटा नजीक पुलानजीक ब्रेकर जवळ ट्रकने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीस्वार महिलेचा ट्रकच्या चाकात येऊन मृत्यू झाला आहे.

रविवारी (दि.25 मे) सकाळी 10 वाजताच्या सुमारास नागपूर बहादुरा येथील बांबूवन नगरीतील जयश्री पुंडलिक लिखितकर (वय 61) ह्या त्यांची मुलगी रोशनी राहुल थोटे, 3 वर्षांची नातीन अयांशी राहुल थोटे यांच्यासह त्यांच्या दुचाकी मोपेट क्र. एमएच 49 सी के 8026 ने कुही तालुक्यातील प्रसिद्ध आंभोरा देवस्थान येथे दर्शन करण्यासाठी आल्या होत्या. व त्यांच्या सोबत दुसऱ्या दुचाकीवर अंशुता गोधडे व पलक कोसे ह्या सुद्धा देवदर्शनाला आल्या होत्या. आंभोरा येथून दर्शन करून पाचही जण नागपूरकडे परत जाण्यास निघाले. दरम्यान सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उमरेड-नागपूर मुख्य मार्गालगत असलेल्या कुही फाटा पुलियाजवळील ब्रेकर जवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच 40 सिटी 1259 याने रोशनी धोटे चालवत असलेल्या दुचाकी मोपेड वाहनाला कट मारली. यात दुचाकी मोपेड वाहनवरील रोशनी धोटे, अयांशी धोटे व जयश्री लिखितकर तिघ्याही खाली पडला. यातील जयश्री लिखितकर ( वय 61) यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्यातून व कानातून रक्त जाऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर रोशनी धोटे व चिमुकली अयांशी धोटे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून महिलेचे मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी निष्काळजीपणाने ट्रक चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप लांजेवार करीत आहेत.

* अन मुलगी अन नातीन सुदैवाने बचावली

रविवारी आंभोरा येथून नागपूर कडे परत जात असताना झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकात डोके येऊन आईचा घटनास्थळी मृत्यु झाला आहे. यात सुदैवाने मुलगी रोशनी व नातीन अयांशी ह्या थोडक्यात बचावल्या असून आईला रक्ताच्या थारोड्यात मृत्युमुखी पडलेले पाहून मुलगी रोशनी हिने टाहो फोडला आहे. देवदर्शनाला जाऊन परत येत असताना काळाने घाला घातल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.