सचिन घुमरे यांची तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती
कुही:- कुही तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सचिन घुमरे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कुही तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत घुमरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कुही नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष अमित ठवकर,नगरसेवक मयूर तळेकर,नगरसेवक रुपेश मेश्राम,संजय इंदोरकर, आकाश लेंडे, निखिल खराबे, उमेश बांते, भास्कर खराबे सह ओबीसी बांधव उपस्थित होते.