गोंदियात शिवशाही उलटून भीषण अपघात ; ८ जणांचा मृत्यू तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता.

गोंदियात शिवशाही उलटून भीषण अपघात 

८ जणांचा मृत्यू तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

गोंदिया :- सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी-डव्वा या गावशिवारातील नाल्याजवळ भंडाराकडून गोंदियाकडे येणारी  शिवशाही बस उलटली. ही घटना आज (ता.२९) दुपारी १ वाजता सुमारासची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,भंडारा-गोंदिया हि शिवशाही बस शुक्रवारी (दि.9) दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येत होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास २० फुट रस्त्यापासून घासत गेली. या भीषण अपघातात जवळपास ८ ते १०   प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर १२ ते १५ प्रवासी जखमी असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पथकाने घटनास्थळ गाठून बचाव कार्याला सुरूवात केली आहे.  या अपघाताची भीषणता पाहून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.