मेंढपाळाचा सर्पदंशाने मृत्यू
सावंगी शिवारातील घटना
कुही:- तालुक्यातील मौजा सावंगी शिवारात खाली जागेवर शेळ्या चारत असलेल्या मेंढपाळाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सुरेश लहानु सिंदूरकर (वय-48) रा. सावंगी (चापेगडी) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. सुरेश नेहमी प्रमाणे आपल्या घरी पाळलेल्या शेळ्या घेऊन गावानजीक खाली जागेत चारत होता. शनिवारी दुपारी 3 च्या दरम्यान शेळ्या चारत असताना त्याला सर्पदंश झाला. त्याला लागलीच कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


